तात्या टोपे नगर नागरिक मंडळ तर्फे सत्कार

    दिनांक :07-May-2026
Total Views |
नागपूर ,
Tatya Tope Nagar, Nagpur तात्या टोपे नगर नागरिक मंडळ तर्फे ६ मे रोजी नागपुरातून विधान परिषदेत नुकतेच निर्वाचित झालेले प्रा. संजय भेंडे तसेच प्रभाग ३७ मधून निवडून आलेले नगरसेवक प्रा. दिलीप दिवे, संजय उगले, अश्विनी जिचकार आणि निधी तेलगोटे यांचा संवाद व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र जोग यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यवाह मनोहरराव ढोक यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. नागरिक मंडळाच्या सदस्यांनी आमदार व सर्व नगरसेवकांचा सत्कार केला.
 
 
nj
 
 
यावेळी मनोहरराव ढोक यांनी वस्तीतील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि लोकप्रतिनिधींची कर्तव्ये याविषयी सविस्तर मांडणी केली. Tatya Tope Nagar, Nagpur आमदार प्रा. संजय भेंडे यांनी आपल्या मनोगतात नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका मांडली. तसेच सर्व नगरसेवकांनी नागरिकांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी राहणार नाहीत व आपण २४ तास उपलब्ध राहू, असे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे संचालन संजय खांडवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आनंद मुळे यांनी केले. कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य:चंद्रहास मुळे,संपर्क मित्र