अल्पवीयन मुलीची छेड काढणारा ‘तो’ आरोपी गजाआड

- देवरी येथील विनयभंग प्रकरण ः आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी

    दिनांक :07-May-2026
Total Views |
गोंदिया,
molested minor girl वसतीगृहात राहणार्‍या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या फरार आरोपीला अखेर देवरी पोलिसांनी ६ मे रोजी ताब्यात घेतले असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. काशीनाथ शहारे (६२) रा. देवरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
 
molested minor girl
 
 
देवरी शहरातील एका वसतीगृहात राहणार्‍या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना २४ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी पिडीत मुलगी व तिच्या शिक्षिकेच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांत गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला होता. मात्र, गुन्हा नोंद होताच आरोपी काशीनाथ शहारे हा फरार झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले होते. या घटनेमुळे शहरात संताप पसरला असतानाच शहरातील महिलांनी एकत्र येत सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत अपर पोलिस अधीक्षक देवरी कॅम्प त्याचबरोबर पोलिस अधीक्षक गोंदिया व राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन सादर केले होते. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला त्वरीत अटक करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.molested minor girl दरम्यान अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उवपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात देवरी पोलिसांनी बुधवारी आरोपी काशीनाथ शहारे यास अटक करुन न्यायालयात हजर केले. यावर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.