-असा संदेश देऊन तृतीयपंथीयाची आत्महत्या
अनिल कांबळे
नागपूर,
Transgender suicide ‘‘किशाेरवयात असतानाच मला किन्नर असल्यामुळे कुटुंबापासून दुरावले आणि साडी नेसून बिदागी मागताना समाजानेही झिडकारले. लाचारीचे जीवन अन् हालअपेष्टा सहन करीत मी आतापर्यंत जीवन कंठले. मात्र, पाेटाची खडगी भरण्यासाठी बिदागी मागतानाच रेल्वेतून पडून अपघातात मला पाय गमवावा लागला. त्यामुळे उर्वरित आयुष्यसुद्धा भिक मागण्यातच जाणार, याची चिंता सतावत हाेती. त्यामुळे आता नुसतं जगण्यात अर्थ उरला नाही, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे,’’ असा भावनिक संदेश देऊन राधिका नावाच्या तृतीयपंथीयाने मेडिकलमध्ये बँडेज पट्ट्यांनी गळास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी मेडिकलमध्ये उघडकीस आली.
(संग्रहित छायाचित्र )
Transgender suicide राधिका जाधव (30) ही मूळची अमरावती जिल्ह्यातील हाेती. दहावीपर्यंत शिक्षण घेतानाच तिला तृतीयपंथी असल्याचे राधिकाच्या लक्षात आले. हळूहळू तिच्या कुटुंबियांनाही ते लक्षात आले. कुटुंबियांनी राधिकाशी दुुरावा ठेवणे सुरु केले. नकाे ते बाेलणे आणि घरात हाेणारा मानसिक छळ यामुळे कंटाळलेल्या राधिकाने अमरावती गाठले. तृतीयपंथी समाजाच्या संघटनेच्या पदाधिकाèयांची भेट घेतली आणि त्यानंतर घराचा रस्ता विसरुन ती राधिका म्हणून अमरावतीत राहायला लागली. पाेटाची खळगी भरण्यासाठी साडी नेऊन रस्त्यावर बिदागी मागणे सुरु केले. रेल्वे स्थानकावर राहणे आणि तेथेच मिळेले ते खाऊन दुसèया दिवशी पुन्हा रस्त्यावर उभे राहणे,हाच तिचा नित्यक्रम. रेल्वेत बिदागी मागत असताना राधिकाचा ताेल गेल्याने ती रेल्वेतून खाली पडली आणि तिचा पाय ्रॅक्चर झाला. या अपघातात राधिका हिचा पाय पूर्णपणे कापण्यात आला. सुरुवातीला अमरावतीतल्या इर्वीन रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी मेडिकलच्या अस्थिराेग विभागात दाखल करण्यात आले हाेते. वाॅर्डात ती गुरुवारी सकाळी खाटेवरच जखमा बांधण्यासाठी वापरल्या जाणाèया बँडेजने गळास घेतलेल्या अवस्थेत आढळली. सकाळी साई करत असलेल्या कर्मचाèयाला हा प्रकार निदर्शनास आल्यान परिसरात खळबळ उडाली. अजनी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.
वाॅर्डातच घेतला गळास
राधिका कापलेला पाय बघून नेहमी रडत हाेती. आता माझे कसे हाेणार, या चिंतेत ती असायची. त्यामुळे ती नैराश्यात गेली. अपघातानंतर, ती सततच्या आणि असह्य वेदना व यातनांनी त्रस्त हाेती. दीर्घकाळापासून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू हाेते. राधिकाने वाॅर्डमध्ये उपलब्ध बँडेज आणि वैद्यकीय पट्ट्यांचा वापर करून एक ास तयार केला; ताे ास आपल्या रुग्णालयातील खाटेला बांधला आणि त्याचा वापर करून आपले जीवन संपवले. सध्या अजनी पाेलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.