transgenders rally तृतीयपंथीय संघटनेतील सक्रिय सदस्य चमचम गजभिये हत्याकांडातील आराेपी उत्तम बाबा सेनापती याच्या पीठाधिपती हाेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या अभिषेकाला विराेध करत चमचम समर्थक तृतीयपंथियांनी बुधवारी सिताबर्डी पाेलिस ठाण्याला घेराव घालत संताप व्यक्त केला. उत्तम बाबा विराेधात आधीच हत्येचा गुन्हा दाखल असताना त्याला समाजातील मठाचा अधिपती हाेण्यापूर्वी कायदेशीर कारवाई करावी, असा आक्राेश तृतीयपंथियांनी व्यक्त केला.
या घडामाेडीत पीठाधिपती प्रक्रियेच्या निमित्त तृतियपंथीय समाजाचे राष्ट्रीय स्तरावत प्रतिनिधीत्व करणारे हिमांगी सखी हे रामदासपेठ येथील एका हाॅटेलमध्ये मुक्कामी असल्याने तृतियपंथीयांनी तेथे देखील धडक देत आपला विराेध व्यक्त केला.
शहरात 2019 मध्ये चमचम गजभिये हिच्या हत्याकांडात उत्तम बाबा सात वर्षांनंतर सध्या जामिनावर बाहेर आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाली हाेती. या घटनेनंतर, तृतीयपंथीयांनी सतत निदर्शने आणि आंदाेलने केली. प्रत्येक वेळी न्यायालयात जामीन अर्जांना गजभिये समर्थकांनी विराेध केला आहे.transgenders rally जिल्हा न्यायालयाने अलिकडेच त्याला जामीन मंजूर केला हाेता. त्या वेळी देखील तृतीयपंथियांनी या जामिनाला विराेध करण्यासाठी जिल्हा न्यायालयासमाेर आंदाेलन केले हाेते. या घडामाेडीत उत्तम बाबा याचा तृतीयपंथी महामंडलेश्वर हिमांगी सखी यांच्या हस्ते अभिषेक हाेणार हाेता. त्याची कुणकूण लागताच तृतीयपंथीयांनी याला तीव्र विराेध केला आहे.