विजयच्या पक्षात होणार त्रिशाची एन्ट्री?

    दिनांक :07-May-2026
Total Views |
चेन्नई. 
Trisha's entry into Vijay's party? विजय यांच्या राजकीय प्रवासाने तामिळनाडूमधील राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत दमदार कामगिरी केली असून, सत्तास्थापनेसाठी आता वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. विजय यांच्या पक्षाला १०८ जागांवर यश मिळाल्यानंतर राज्यभरात त्यांच्या समर्थकांकडून उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चांनाही वेग आला आहे. वृत्तांनुसार, विजय यांच्या पक्षाकडून तिला पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू आहे. विजय यांनी दोन मतदारसंघांत विजय मिळवल्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी त्रिशाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
krishna
 
विजय आणि त्यांच्या पक्षातील नेते एका विशिष्ट मतदारसंघाला प्राधान्य देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यानुसार दुसऱ्या जागेवर पोटनिवडणूक होणार असून, त्या ठिकाणी त्रिशाला उमेदवार करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र त्रिशाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याने ती या निर्णयाबाबत साशंक असल्याचीही माहिती मिळत आहे.विधानसभेतील एकूण संख्याबळाचा विचार करता विजय यांच्या पक्षाला बहुमतासाठी अजून काही जागांची गरज आहे. त्यामुळे इतर पक्षांशी संभाव्य युतीबाबत चर्चाही सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सरकार स्थापनेसाठी विजय यांनी राज्यपालांकडेही दावा सादर केल्याची माहिती पुढे आली आहे. तामिळनाडूच्या राजकारणात सुरू असलेल्या या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांत मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.