उमखेड येथे वीज पडून एक ठार
यवतमाळ,
Umkhed unseasonal rain यवतमाळसह जिल्ह्यात गुरुवार, ७ मे रोजी अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. यवतमाळ, आर्णी, दिग्रस, घाटंजी, दारव्हा व उमरखेड शहरात दुपारी १.३० च्या सुमारास, काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस कोसळला. उमरखेड येथील दराटी वीज पडून श्रीनिवास देवीदास राठोड हा इसम ठार झाला, तर एक महिला व मुलगा गंभीर जखमी झाले. तसेच झरी जामणी तालुक्यातील रायपूर येथे आलेल्या वादळामुळे अनेक घरांची टिनपत्रे उडून गेली, तर मोठमोठाली झाडे उन्मळून पडली.
Umkhed unseasonal rain अवकाळी पावसामुळे शेतकर्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी वार्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांचे झाले आहे. दिग्रस येथे अचानक पाऊस आल्याने येथील आठडीबाजारी परिसरातील फेरीवाल्यांची चांगलीच पळापळ झाली. दुकानांपुढे लावलेल्या हिरव्या जाळ्या तुटून हवेबरोबर उडाल्याने दुकानदारांना हे सावरता सावरता नाकी नऊ आले. या नैसर्गिक आपत्तीची दखल घेऊन महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही नुकसानग्रस्त नागरीकांनी केली आहे.