उमखेड येथे वीज पडून एक ठार
यवतमाळ,
unseasonal rain यवतमाळसह जिल्ह्यात गुरुवार, ७ मे रोजी अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. यवतमाळ, आर्णी, दिग‘स, घाटंजी, दारव्हा उमरखेड शहरात दुपारी १.३० च्या सुमारास, काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस कोसळला. उमरखेड येथील दराटी येथे वीज पडून एक इसम ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. पावसाच्या या आगमनाने उन्हाने त्रस्त झालेल्या जीवांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. उष्णतेचा पारा घसरल्याने वावतावरणात थंडावा निर्माण झाला होता.
अवकाळी पावसाचा तडाखा
दराटीत विजेचा कहर, एक ठार
उमरखेड : तालुक्यात गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत कडक उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा दिला. दुपारी १ च्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ हवेसह हलका पाऊस सुरू झाला. सकाळपासून वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा अनुभवायला मिळाला. या अवकाळी पावसासोबतच वीज पुरवठ्याचा लपंडाव पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पाऊस सुरू होताच शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित झाला. ऐन दुपारच्या वेळेत वीज गेल्याने घरगुती कामे, व्यापारी व्यवहार तसेच कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला. पाऊस आला की वीज जाणारच अशी परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिकि‘या नागरिकांकडून उन्हाळ्यात आधीच वारंवार होणार्या लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त असताना किरकोळ पावसातही वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
unseasonal rain दरम्यान, अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे दराटी गावातील शिवाजीनगर तांडा येथे दुर्दैवी घटना घडली. वीज पडून श्रीनिवास देविदास राठोड यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या दुर्घटनेत नंदा जीवन आडे (वय ३८) आणि यश बाळू आडे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी वार्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणा सक्षम करून अखंडित वीज पुरवठा द्यावा, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दारव्ह्यात विजेच्या गर्जनेसह जोरदार पाऊस
दारव्हा : दारव्ह्यात उन्हाचे तापमान वाढत असतानाच अचानक गुरुवार, ७ मे रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. शहरातील तसेच तालुक्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत असताना आणि उन्हाच्या तापमानात वाढता उकाडा आणि त्यातही विजेचा लपंडाव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. झालेल्या पावसामुळे तात्पुरता गारवा जाणवत आहे.
दिग्रसला भर उन्हाळ्यात पावसाची हजेरी
दिग्रस : उन्हाळ्यात वादळी वार्यासह unseasonal rain अवकाळी पावसाने गुरुवार, ७ मे रोजी दुपारी १२ जोरदार हजेरी लावली. या अनपेक्षित पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा मिळाला असला तरी, काही वेळेसाठी जनजीवन विस्कळीत झाले होते. ऐन उन्हाळ्यात पडणार्या पावसामुळे उन्हाळी धान पिकांचे नुकसान होणार असून शेतकर्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. तालुक्यातील ईसापूर, तुपटाकळी, वसंतनगर, मांडवा, हरसूल या गावांलगत जास्त काळ पाऊस पडला. अचानक पाऊस येथील आठडीबाजारी परिसरातील फेरीवाल्यांची चांगलीच पळापळ झाली. उन्हापासून बचाव करण्यासाठी दुकानदारांनी दुकानांपुढे लावलेल्या हिरव्या जाळ्या तुटून हवेबरोबर उडाल्याने दुकानदारांना हे सावरता सावरता नाकी नऊ आले. उन्हाळ्यात जमीन जास्त तापल्यामुळे आणि आर्द्रतेमुळे हे ढग तयार होऊन पाऊस पडतो असा अंदाज आहे. पुढील काळातही हवामानात असे बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
पावसाचा रायपूर (झरी) येथे कोलाम वस्तीला तडाखा
घरांवरील टिनपत्रे उडाली
झरी जामणी : यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील रायपूर येथे झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने आणि वादळी वार्याने कोलाम वस्तीतील जनजीवन विस्कळीत केले आहे. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक गरीब कोलाम कुटुंबांच्या घरांवरील टिनपत्रे हवेत उडून गेल्यामुळे ही आता उघड्यावर आली आहेत. या नैसर्गिक आपत्तीची दखल घेऊन महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी आग‘ही मागणी श्यामादादा कोलाम बि‘गेडच्या प्रदेशाध्यक्ष इंदिरा बोंदरे यांनी केली आहे.