यवतमाळात आरोपीकडून दोन देशी पिस्तुल जप्त

    दिनांक :07-May-2026
Total Views |
यवतमाळ,
Yavatmal crime यवतमाळ शहर डीबी पोलिस पथकाने एका व्यक्तीकडून दोन देशी पिस्तुल व चार जिवंत काडतूस ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई गुरुवार, ७ मे रोजी करण्यात आली आहे. डीबी पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिस ठाणे परिसरात एक व्यक्ती देशी पिस्तुल लावून फिरत होता. ही माहिती ठाणेदार रामकृष्ण जाधव यांना दिली असता त्यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता तत्काळ पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले.
 
 
aropi
 
Yavatmal crime पोलिस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, दीपक घोगरे, रावसाहेब शेंडे, किरण पडघन, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, पवन तडसे, मयुर तेल्लेवार यांनी नागपूर बायपास डंपिंग ग्राऊंडच्या बाजूला सापळा असता एक व्यक्ती हा स्कूटरने जाताना दिसून आला. त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सुजित रावसाहेब कदम (४६, शुभम अपार्टमेन्ट, संकटमोचन रोड, माईंदे चौक, हमु समर्थवाडी) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता कमरेला एक पिस्तुल व त्यात दोन जिवंत काडतूस आनि स्कूटरमध्ये एक पिस्तुल व त्यामध्ये दोन जिवंत काडतूस आल्या. दोन देशी बनावटी पिस्तुल, किंमत अंदाजे ८० हजार रुपये व चार काडतुस २० हजार रुपये, एक स्कूटर १ लाख रुपये असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.