सरस्वती विद्या मंदिरच्या वर्धा, वायगावचा निकाल १०० टके निकाल

    दिनांक :08-May-2026
Total Views |
वर्धा, 
10 Exam Result भरत ज्ञान मंडळद्वारा संचालित सरस्वती विद्या मंदिर शाळा समूहातील वर्धेतील दोन आणि वायगाव येथील एक अशा तीनही शाळांचा निकाल १०० टके लागला. वर्धा येथील सरस्वती विद्या मंदिर मराठी माध्यमिक शाळेचा निकाल १०० टके लागला असून नेतल येनुरकर हिने ९३.८० टके गुण घेत प्रथम क्रमांक पटकाविला. वत्सल मरजिवे ८८.०० द्वितीय आणि आर्या ढगे हिने ८७.०० टके गुण घेत तृतीय क्रमांक मिळविला.
 
 
सरस्वती विद्या मंदिर इंग्रजी हायस्कूलचा निकाल १०० टके लागला असून समिक्षा अड्रस्कर हिने ९४.८० टके गुण घेत प्रथम, अक्षरा कडू ९३.६० द्वितीय आणि आर्यन देशमुख याने ९२.४० टके गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. वायगाव येथील स्वामी कोरडे याने ८७.२० टके गुण घेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. श्रृती कारमोरे ८५.४० द्वितीय आणि जारीया शेख हिने ७८. २० टके गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रकाश देशपांडे, संस्थेचे सचिव संजय जलताडे, कोषाध्यक्ष मदन परसोडकर, संचालक अपर्णा हरदास, मुख्याध्यापक मनिषा काळे, ममता विंचूरकर, चेतन दंढारे यांनी अभिनंदन केले आहे.
 
 
केसरीमल नगर विद्यालयाचा आदर्श वेले केंद्रात प्रथम
 

ADARSH 
 
सिंदीरेल्वे : सिंदी रेल्वे केंद्रातून येथील केसरीमल नगर विद्यालयाचा आदर्श वेले याने ९६.८० टके गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक प्राप्त केला. 10 Exam Result  तर संस्कृत विषयात शंभर पैकी १०० गुण प्राप्त केले. नाविन्य परांडे याने ९४.४० गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावला. प्रगती इंग्लिश स्कूलची जान्हवी तळवेकर हिने ९२.४० गुण घेत तृतीय क्रमांक तर म्यु. नेहरू विद्यालयाचा मंयक गायकवाड याने ९२.२० टके गुण घेत चौथा क्रमांक मिळविला. प्रगती इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टके, गुंज कॉन्व्हेट ९७.७७ टके, म्यु. नेहरू विद्यालयाचा निकाल ८४.४४ टके लागला.
 
संस्कार ज्ञानपीठची नेहा धोबे तालुयात प्रथम
 
 
समुद्रपूर : शहरातील संस्कार ज्ञानपीठ शाळेने यशाची परंपरा कायम १०० टके निकाल दिला. या शाळेची नेहा धोबे हिने ९५.४० टके गुण मिळवत तालुयात प्रथम क्रमांक पटकावला. तर तृषिका चौधरी हिने ९५.०० टके गुणांसह तालुयात द्वितीय क्रमांक मिळविला. अनुष्का महाजन हिने ९४.२० टके गुण घेत तालुयात तृतीय स्थान प्राप्त केले. श्रद्धा येवले ९३.८० टके आणि ग्यानी जयस्वाल हिने ९३.०० टके गुण प्राप्त केले.