*९२.१० टके मुली तर ८२.६६ टके मुले उत्तीर्ण
* निकालात कारंजाची सरशी
वर्धा,
10th class exam results in Wardha district महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवार ८ रोजी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८७.२४ टके लागला असून यंदाही निकालात मुलींनींच आघाडी घेतली. जिल्ह्यातील ९२.१० टके मुली तर ८२.६६ टके मुले उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ५३ शाळांचा निकाल १०० टके लागला आहे. विेशेेष म्हणजे जिल्ह्यात पहिला कारंजा (घा.) येथील गुरूकुल विद्यालयाचा सृजल जाधव याने ९८.८० तर वर्धा येथील अग्रग्रामी हायस्कूल, पिपरी (मेघे) येथील हिमांशु क्षीरसागर यांने ९८.६० टके गुण घेऊन दुसरा क्रमांक पटकावला.
10th class exam results in Wardha district वर्धा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेकरिता १५ हजार २९१ परीक्षार्थी प्रवेशित होते. त्यातील १५ हजार १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १३ हजार २१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रावीण्य श्रेणीत २ हजार ५६८, प्रथम श्रेणीत ४ हजार ८६ तर ४ हजार ४७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. २ हजार ८८ परीक्षार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. या निकालाची टकेवारी ८७.२४ टके आहे. नागपूर विभागात दहावीच्या निकालात वर्धा जिल्हा चौथ्या स्थानावर आहे. कारंजा घाडगे येथील गुरुकुल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सृजल जाधव ९८.८० टके गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आला. वर्धेतील अग्रग्रामी हायस्कूलचा विद्यार्थी हिमांशु क्षीरसागर द्वितीय आला तर गुरुकुल पब्लिक स्कूलचीच विद्यार्थिनी अक्षरा इंगळे आणि आर्वी येथील कृषी इंग्लिश विद्यालयाचा अमेय देशमुख, पुलगाव येथील इंडियन स्कूल ऑफ स्कॉलर्सची अक्षरा सुनील वाठोरे यांनी अनुक्रमे ९८.४० टके गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय ठरले. आर्वी येथील कृषक इंग्लिश विद्यालयाचा गौरव तिजारे याने ९८ टके गुण घेतले.
गत वर्षीच्या तुलनेत यंदा घसरण
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्याच्या निकालात घसरण झाली आहे. मागीलवर्षी वर्धा जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८८.८६ टके लागला होता. तर यंदाच्या वर्षी ८७.२४ टके निकाल लागला आहे. शिवाय नागपूर विभागात क्रमवारीतही घसरण झाली आहे. मागीलवर्षी निकालात तिसर्या क्रमांकावर असलेला वर्धा जिल्हा यावर्षी चौथ्या क्रमांकावर आहे