दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

    दिनांक :08-May-2026
Total Views |
यवतमाळ जिल्हा विभागात शेवटून दुसरा
जिल्ह्याचा निकाल 88.38 टक्के
यंदाही मुलींची मुलांवर मात

यवतमाळ, 
10th exam result महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) शुक्रवार, 8 मे रोजी घोषित झालेल्या निकालात यवतमाळ जिल्ह्याने 88.38 टक्केवारीसह अमरावती विभागात शेवटून दुसरे स्थान पटकावले आहे. अमरावती विभागाचा एकूण निकाल 90.50 टक्के आहे. सर्वाधिक 93.95 टक्के निकाल बुलढाणा जिल्ह्याचा आहे. त्या खालोखाल अकोला 90.74, तिसèया क्रमांकावर अमरावती जिल्हा 90.06, चौथ्या क्रमांकावर यवतमाळ 88.38 आणि शेवटच्या क्रमांकावर 88.04 टक्केवारीसह वाशिम जिल्हा आहे.
 

exam 
 
यवतमाळ जिल्ह्यातील तालुकाश: निकालांमध्ये पुसद तालुक्याने 94.08 टक्केवारीसह प्रथम क्रमांक पटकावला तर 76.46 टक्केवारीसह राळेगाव शेवटच्या क्रमांकावर फेकले गेले आहे. यवतमाळ तालुका 92.09, नेर 91.29, दारव्हा 87.07, दिग्रस 83.13 आर्णी 88.25, उमरखेड 89.63, महागाव 90.11, बाभुळगाव 87.53, कळंब 78.12, मारेगाव 85.00, पांढरकवडा 84.21, झरीजामणी 88.13, वणी 85.94 आणि घाटंजी तालुक्यातील शाळांचा निकाल 89 टक्के इतका लागला आहे.
 
यवतमाळ जिल्ह्यातून 37 हजार 950 जणांनी दहावीच्या शालांत परीक्षेचे अर्ज भरले. त्यामध्ये 19 हजार 842 मुले व 18 हजार 108 मुलींचा समावेश होता. त्यापैकी 37 हजार 499 विद्यार्थी परीक्षेस बसले. यामध्ये 19 हजार 555 मुले आणि 17 हजार 944 मुलींचा समावेश होता. त्यापैकी 33 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 16 हजार 524 मुले आणि 16 हजार 620 मुलींचा समावेश आहे. 84.50 टक्के मुले तर 92.62 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.
 
10th exam result  यवतमाळ जिल्ह्याची दहावी परीक्षेतील निकालाची टक्केवारी 88.38 आहे. यावर्षी देखील मुली व मुलांच्या टक्केवारीमध्ये तब्बल 8 टक्क्यांचा फरक पाहायला मिळाला. मुलींनी मुलांवर मात करण्याची परंपरा यंदादेखील कायम राहिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या 33 हजार 144 मुलांपैकी 6 हजार 965 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 11 हजार 314 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 10 हजार 686 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 4 हजार 179 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले. अमरावती विभागातील एकूणच उत्तीर्णतेचे प्रमाण प्रचंड आहे. त्यातही 90 टक्क्यांहून अधिक गुण घेणाèया विद्यार्थ्यांची संख्या 6 हजार 69 असून 85 ते 90 टक्के गुण मिळवणारे 9 हजार 215 आहेत. 80 ते 85 टक्के गुण मिळवणारे 12 हजार 212 आणि 75 ते 80 टक्के गुण मिळवणारे 13 हजार 716 इतके प्रचंड संख्येतील विद्यार्थी आहेत.
दारव्हा तालुक्यातील 6 शाळांचा निकाल 100 टक्के
दारव्हा : बोर्डाच्या झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार, 8 मे रोजी लागला असून दारव्हा तालुक्यातील 6 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात छत्रपती विद्यालय (शेलोडी), अल्लामा इक्बाल हायस्कूल (लाडखेड), नॅशनल उर्दू हायस्कूल (महागाव कसबा), लिटील बर्ड हायस्कूल (दारव्हा), लिटील स्टार इंग्लिश स्कूल (बोरी) व हजरत ख्वाजा चिस्ती हायस्कूल (तळेगाव) या शाळांचा समावेश आहे.