- जिल्ह्याचा निकाल ८७.५८ टक्के ः यंदाही मुलीच अग्रेसर
दिनांक :08-May-2026
Total Views |
गोंदिया,
10th result gondiya ranks महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ८७.५८ टक्के लागला असून, जिल्हा नागपूर विभागात दुसर्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निकालातही जिल्ह्यातील विद्यार्थिनीच गुणानुक्रमे टक्केवारीत समोर असल्याचे दिसून येत आहे.
इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर दहावी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनादेखील होती. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर केला. गतवर्षीची परंपरा कायम राखत विद्यार्थिनी यंदाही टक्केवारीत समोर आहेत. जिल्ह्यात एकूण १८ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता नोंदणी केली होती. यापैकी १८ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात नऊ हजार ७९८ विद्यार्थी, तर नऊ हजार ३० विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी आठ हजार ११४ विद्यार्थी, तर आठ हजार ३७७ विद्यार्थिनी असे एकूण १६ हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८२.८१, तर विद्यार्थिनींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.७६ इतकी आहे.10th result gondiya ranks यावरून गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थिनीच समोर असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे शुक्रवारी जाहिर झालेल्या निकालात गोंदिया जिल्हा नागपूर विभागात दुसर्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर नागपूर ९३.४४ टक्के आहे.