अक्षरा वाठोरे होणार इंजिनिअर

    दिनांक :08-May-2026
Total Views |
पुलगाव, 
Akshara Wathore शिक्षण क्षेत्रात पुलगावची मान उंचावणारी अभिमानास्पद कामगिरी इंडियन स्कूल ऑफ स्कॉलर्सची अक्षरा सुनील वाठोरे हिने केली आहे. ९८.४० टके गुण मिळवत देवळी तालुयात ती प्रथम आली. तिने इंजिनिअर होण्याची इच्छा व्यत केली आहे. अक्षरा हिने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले.
 
 
AKSHRA
 
Akshara Wathore  अभ्यासासोबतच वेळेचे योग्य नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हे यश मिळाल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे, भविष्यात इंजिनिअर बनून देशसेवा करण्याची इच्छा तिने व्यत केली आहे. अक्षराचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून तिच्या मेहनतीमुळे शाळेचा नावलौकिक वाढला असल्याचे मत मुख्याध्यापकांनी व्यत केले. अक्षराच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष कृष्णा कडू, माधवी कडू, मुख्याध्यापक दीपाली तुपकरी, अर्चना भोजने तसेच शिक्षक शिक्षेत्तर कर्मचारी, विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले.