- हवालदार पतीवर गुन्हा दाखल
अनिल कांबळे
नागपूर,
Assault case पाेलिस खात्यात नाेकरीवर असलेल्या प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन पाेलिस हवालदार पतीने मारहाण केली. तिला माहेरुन पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला. या प्रकरणी हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. नितेश वहिले असे संबंधित आराेपी पाेलिस हवालदाराचे नाव आहे. त्याचे 2016 मध्ये लग्न झाले. मात्र लग्नानंतर ताे सातत्याने पत्नीला त्रास देत हाेता. पत्नीला अनेकदा त्याने देवपूजा करण्यावरुन शिवीगाळ करत मारहाणदेखील केली.
Assault case तसेच तिच्या नातेवाईकांनादेखील ताे शिवीगाळ करायचा. नितेशचे एका महिलेसाेबत प्रेमसंबंध हाेते, असा आराेपी पत्नीने केला आहे. कर्तव्यावरुन परत येताना पत्नीला उशीर झाल्यावर ताे तिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करायचा व अनेकदा मारहाणदेखील करायचा. 17 एप्रिल राेजी त्याची पत्नी नातेवाईकाच्या लग्नासाठी भरतवाडा येथे गेली हाेती. तेथून येण्यास उशीर झाल्याने ती तिच्या आईकडेच मुक्कामी थांबली. त्यावरून दुसèया दिवशी आराेपीने वाद घातला व तिला जबर मारहाण केली. त्याने तिला ‘आत्ताच्या आत्ता घरातून निघून जा, नाही तर जिवंत साेडणार’ नाही अशी धमकीदेखील दिली. पत्नीच्या तक्रारीवरून नितेशविराेधात एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणेदार गाेकूळ महाजन यांनी दिली.