पहिल्या दिवसाचा खेळ संपला; बांगलादेश मजबूत स्थितीत

    दिनांक :08-May-2026
Total Views |
ढाका,
ban-vs-pak-1st-test : बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली असून, पहिला सामना ८ मे रोजी ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा, यजमान बांगलादेश ४ गडी गमावून ३०१ धावा करून मजबूत स्थितीत दिसत होता. बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात दोन्ही सलामीचे फलंदाज लवकर गमावले, परंतु मोमिनुल हक आणि नाझमुल होसेन शांतो यांनी तिसऱ्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी करून आपली स्थिती मजबूत केली. शांतोने पहिल्या डावात १०१ धावा केल्या, तर मोमिनुल हकचे शतक हुकले आणि तो ९१ धावांवर परतला.
 
 
 
BAN
 
 
 
ढाका कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशचे अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम ४८ धावांवर आणि लिटन दास ८ धावांवर नाबाद होते. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी, मोहम्मद अब्बास, हसन अली आणि नौमान अली यांनी पहिल्या दिवशी प्रत्येकी एक बळी घेतला.
 
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तान सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले असून, त्यापैकी एकात त्यांना विजय आणि दुसऱ्यात पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे, बांगलादेश आठव्या क्रमांकावर आहे. त्यांनीही दोन सामने खेळले असून, त्यापैकी एकात त्यांना पराभव आणि दुसऱ्यात बरोबरी झाली आहे. ते आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.