नागपूर
beltrodi Nagpur बेलतरोडी गावालगत असलेल्या गार्डन कोर्ट हाऊसिंग सोसायटीतील नव्याने उभारलेल्या मंदिरात ९ ते ११ मे दरम्यान तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्रीगणेश, दुर्गामाता, विठ्ठल-रुखमाई, शिवलिंग, नंदी, नागदेवता व हनुमानजी यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे.
९ मे रोजी सायंकाळी सर्व मूर्तींची धान्यराशीत स्थापना करण्यात येईल. १० मे रोजी सकाळी कलशयात्रेनंतर विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा व हवन होणार आहे. beltrodi Nagpur ११ मे रोजी पहाटे भस्मारती तर दुपारी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र