भीषण अपघातात भाजप नेत्याचा मृत्यू

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
BJP leader dies in accident उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात भीषण अपघातात भाजपच्या एका स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. टिळक समारंभ आटोपून परतताना भरधाव मोटारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात कोसळले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रशांत त्रिपाठी असे असून ते कन्नौजमधील जसोडा परिसरातील रहिवासी होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, प्रशांत त्रिपाठी हे मित्रांसह सीतापूर जिल्ह्यातील सिंधौली येथे एका समारंभासाठी गेले होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ते घरी परतत असताना मटियामऊ गावाजवळील धोकादायक वळणावर वाहनावरील ताबा सुटला आणि मोटार सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली.
 

 hardoli 
 
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. प्रशांत त्रिपाठी यांच्या पश्चात पत्नी मानसी आणि कुटुंबातील अन्य सदस्य असा परिवार आहे. त्यांचे वडील गोपाल त्रिपाठी हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून प्रशांत त्रिपाठी स्वतःही आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीत होते. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबीयांसह राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.