अनिल कांबळे
नागपूर,
loveaffair crime एका व्यक्तीने त्याच्या मैत्रिणीच्या घरात शिरून तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच बदनामीची धमकी दिली. तसेच ‘तुला थेट पंख्याला लटकून जीवच देण्यास भाग पाडेल’, या शब्दांत धमकी दिली. या प्रकरणामुळे संबंधित महिला व तिचे कुटुंबीय प्रचंड दहशतीत आहेत.

संबंधित महिला एका फ्लॅटमध्ये राहते. तिला लहान मुलगी असून पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला आहे. 2023 साली महिलेची राहुल विनाेद कटकवार (37, नेताजीनगर, एचबी टाऊन) याच्याशी भेट झाली हाेती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली व प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र सप्टेंबर 2025 मध्ये दाेघांमध्ये मतभेद झाले व तिने त्याच्याशी संबंध ताेडले. त्यानंतर राहुल सातत्याने तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत हाेता. 2 मे राेजी ती महिला एका मैत्रिणीसाेबत हाॅटेलमध्ये गेली असता, तेथे राहुलशी भेट झाली. तेथे ताे सामान्यपणे वागला. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता ताे तिच्या घरी पाेहाेचला. त्याने बळजबरीने तिच्या घरात प्रवेश केला. घरात घुसताच त्याने तिला व तिच्या आईला शिवीगाळ केली.loveaffair crime त्यानंतर तुला इतके बदनाम करेन की तुला थेट पंख्याला लटकून जीव द्यावा लागेल, अशी धमकी दिली. महिलेने त्याचा विराेध केला असता, त्याने तिला मारहाण केली. त्यानंतर आराेपी तेथून निघून गेला. हादरलेल्या महिलेने हिंमत करून गणेशपेठ पाेलिस ठाणे गाठले व तक्रार केली. पाेलिसांनी आराेपी राहुलविराेधात गुन्हा दाखल केला आहे.