चंद्रपूर मूल मार्गावर ई-बस जळून खाक

    दिनांक :08-May-2026
Total Views |
चंद्रपूर, 
Burn the e-bus गडचिरोली ते चंद्रपूर या मार्गावर धावणार्‍या ई-बसला अचानक आग लागली. त्यात ही बस पूर्णतः जळून खाक झाली. ‘द बर्निंग ई-बस’चा अनुभव या मार्गावरील प्रवाश्यांनी घेतला. सुदैव म्हणजे, या बसमधील सर्व 43 प्रवासी सुखरूप बाहेर पडले. या अपघातात जीवीत हानी झाली नाही. ही घटना शुक्रवार, 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजता घटांचौकीजवळ घडली.
 
 
e bus
 
महाराष्ट राज्य महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावर धावणारी ही ई-बस मूल बसस्थानकावरून प्रवाश्यांना घेवून निघाली होती. भरधाव वेगा असताना घंटाचौकीजवळ अचानकपणे या बसला आग लागली. धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाश्यांना बाहेर काढले.उन्हाच्या तडाख्यात या बसने लवकरच मोठा पेट घेतला. पूर्ण बस आगीच्या विळख्यात भस्म झाली. चालक वाहकासह सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.
 
 
Burn the e-bus ई-बसला आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. चंद्रपूर जिल्हयात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पारा 45 अंश सेल्सिअसच्याही वर जात आहे. उन्हाचा फटका सर्वसामान्यांसह वाहनांनाही बसत आहे. त्याचेच हे एक उदाहरण. या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि अग्नीशामन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या बसला आग लागल्याने चंद्रपूर ते मूल मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.