- व्हीएसएस ग्रुपचा उपक्रम : शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
गोंदिया,
Buttermilk distribution at Gondia railway station सध्याची भीषण उष्णता आणि वाढता पारा लक्षात घेता, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गोंदियातील व्हीएसएस ग्रुपतर्फे शुक्रवारी ८ मे रोजी स्थानिक रेल्वे स्थानक परिसरात माणुसकीचे दर्शन घडवण्यात आले. ग्रुपच्या सदस्यांनी स्थानकावर ये-जा करणार्या प्रवाशांसाठी आणि पादचार्यांसाठी मोफत ताक वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमातून सुमारे ५०० ते ६०० प्रवाशांना थंड ताक देऊन उन्हापासून दिलासा देण्यात आला.
Buttermilk distribution at Gondia railway station या सेवा कार्याचे नेतृत्व व्हीएसएस ग्रुपचे संस्थापक विनोद (गुड्डू) चांदवानी यांनी केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने गोंदिया रेल्वे स्थानकाचे कमर्शियल इन्स्पेक्टर विनोद यादव उपस्थित होते. त्यांनी ग्रुपच्या या मानवतावादी प्रयत्नाचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष धरम खटवानी, सचिव सुनील संभवानी आणि प्रकाश कोडवानी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच शहरातील प्रतिष्ठित समाजसेवक महेश आहुजा आणि अशोक जयसिंघानी यांनीही उपस्थित राहून सदस्यांचा उत्साह वाढवला. या ताक वाटप कार्यात ‘मटका कोला सेवा समिती’चे विशेष सहकार्य लाभले. यामध्ये समितीचे राजू आसवानी, दिलीप तेजवानी, प्रताप आसवानी, शंकर टेवानी, कविता प्रीथयानी, बबलू तोलानी आणि इतर सदस्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. व्हीएसए ग्रुपचे संस्थापक विनोद चांदवानी यांनी सांगितले की, या कडाक्याच्या उन्हात आणि घामाच्या धारांमध्ये प्रवाशांना थोडी शीतलता आणि आराम मिळावा, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. रेल्वे प्रवाशांनीही ग्रुपच्या या निस्वार्थ सेवेबद्दल आभार मानले आहेत.