धनादेश अनादर प्रकरणात 13 लाखांचा दंड

    दिनांक :08-May-2026
Total Views |
एक महिना कारावास

यवतमाळ, 
येथील न्यायदंडाधिकारी रेणुका मोरे यांनी एका Cheque bounce case धनादेश अनादरित प्रकरणात आरोपी संजय गुरूमुखदास छाबडा याला 13 लाख रुपये दंड व एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यवतमाळचे रहिवासी जवाहर गोविंदानी यांच्याकडून संजय छाबडा याने हातउसने म्हणून 10 लाख रुपये घेतले होते. त्याच्या परतफेडीकरिता छाबडाने 5 लाख रुपयांचे त्याच्या आयडीबीआय बँकेतील खात्यावरील दोन धनादेश जवाहर गोविंदानी यांनी दिले होते.
 

check 
 
हे धनादेश जवाहर गोविंदानी यांनी त्यांच्या खात्यात वटविण्यासाठी जमा केले असता ते अनादरीत झाले. धनादेश अनादरीत झाल्यामुळे गोविंदानी यांनी संजय छाबडा याला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु छाबडाने नोटीसची पूर्तता न केल्याने व अनादरीत धनादेशांची रक्कम गोविंदानी यांना 15 दिवसांत परत केली नाही. अखेर तक्रारदार जवाहर गोविंदानी यांनी अ‍ॅड. किशोर देवाणी यांच्यामार्फत यवतमाळ येथील फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टचे कलम 138 अन्वये प्रकरण दाखल केले.
 
 
Cheque bounce case  दोन्ही पक्षांची बाजू, दाखल केलेली तक्रार, साक्षपुरावे व सादर केलेले दस्तऐवज न्यायालयाने ग्राह्य धरून, आरोपी संजय छाबडा याला 13,00,000 रुपये दंड ठोठावला. तसेच एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावून दंडाची रक्कम भरण्यात कसूर केल्यास, आणखी 15 दिवस शिक्षा आदेशित केली. या प्रकरणात तक्रारदार जवाहर गोविंदानी यांची बाजू अ‍ॅड. इम्रान देशमुख यांनी मांडली. त्यांना अ‍ॅड. युवराज धांदे, अ‍ॅड. मनीष जयस्वाल यांनी सहकार्य केले.