18 वर्षांपासून अविरतपणे सातत्य
दारव्हा,
Free summer camp begins दारव्हा येथे मागील 18 वर्षांपासून दरवर्षी होणाèया 12 दिवसांच्या नि:शुल्क उन्हाळी शिबिरास 6 मे पासून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सुरुवात करण्यात आली. या शिबिरात 8 ते 14 वयोगटातील मुलेमुली सहभागी होत असतात. यात विविध खेळांचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते. शिबिराचे मुख्य आयोजक श्याम पांडे आणि तालुका खेळ व क्रीडा सचिव लक्ष्मण नवरंगे आहेत.
Free summer camp begins शिबिराच्या आयोजनात दारव्हा येथील क्रीडामंडळ चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्ट्स, संकल्प क्रीडा मंडळ, विरजी भिमजी घेरवरा विद्यालय, उमाबाई कणिकर विद्यालय, मास्टर अथेलॉटीक क्रीडा मंडळ, तालुका क्रीडा संकुल सहभागी आहेत. शिबिर उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गणेश म्हातारमारे, ओंकार निमकर, अनिल लाभसेटवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश भोयर यांनी केले. संचालन विजय काळे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रवीण भोयर यांनी केले. यावेळी मिलिंद पांडे, डॉ. सुभाष खाटीक, अशफाक अली, गफुर शेख, रमेश गुडघे, सूत्रसेन भितकर, गोपाळ भोयर, विनोद भोयर, चंदुलाल कनोजिया, अभिजित बेलपत्रे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.