नागपूर,
Gayatri High School महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत शहरातील प्रतिष्ठित गायत्री हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत लक्ष्मी टेंभरे हिने ८५.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. रुद्राणी पोहणकर हिने ८४.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. प्रांजली बावणे हिने ७८.८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. Gayatri High School मृणाली लटोर हिने ७३.३३ टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक तर कनका शेंडे हिने ७१.५० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे.
या यशामागे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा, सचिव, उपसचिव तसेच मुख्याध्यापक आणि संपूर्ण शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. Gayatri High School या निकालामुळे शाळेने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत आपली वेगळी ओळख सिद्ध केली आहे.
सौजन्य: माधुरी नाहतकर, संपर्क मित्र