गडचिरोलीत अत्याधुनिक वैध मापन शास्त्र प्रयोगशाळेसाठी शासनाकडून जमीन मंजूर

    दिनांक :08-May-2026
Total Views |
गडचिरोली,
Government approves जिल्ह्यातील वैध मापन शास्त्र विभागासाठी अत्याधुनिक मानक प्रयोगशाळा व कार्यालयीन इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र शासनाने यासाठी रामपूर येथील शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. महसूल व वन विभागाने ७ मे २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
 

वैध मापन शास्त्र प्रयोगशाळे 
 
 
प्राप्त माहितीनुसार, मौजा रामपूर ता. गडचिरोली येथील सर्वे क्रमांक १७५/४ मधील सुमारे ५०० चौ.मी. शासकीय जमीन निरीक्षक, वैध मापन शास्त्र, गडचिरोली यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या जागेवर दुय्यम मानक प्रयोगशाळा, कार्यकारी मानक प्रयोगशाळा तसेच कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. Government approves या प्रस्तावास विभागीय आयुक्त नागपूर व जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी पाठपुरावा करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ तसेच संबंधित नियमांनुसार ही जमीन महसूलमुक्त व भोगवटामूल्य विरहित स्वरूपात मंजूर करण्यात आली आहे.
 
 
शासनाने जमीन वापराबाबत काही अटीही घातल्या आहेत. मंजूर उद्देशाव्यतिरिक्त जमिनीचा वापर करता येणार नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन विक्री, हस्तांतरण किंवा ताबा देणे प्रतिबंधित राहणार आहे. तसेच जमीन ताब्यात घेतल्यानंतर दोन वर्षांच्या आत बांधकाम सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. Government approves प्रस्तावित प्रकल्पामुळे जिल्ह्यातील वजन व मापे तपासणीसंदर्भातील सुविधा अधिक सक्षम होणार असून व्यापारी व्यवहारातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.