कारंजा (घा.),
दहावीच्या निकालात येथील Gurukul Public School गुरुकुल पब्लिक स्कूलने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. शाळेचा १०० टके निकाल लागला असून तालुका तसेच जिल्हा स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले. यावर्षी शाळेचा सृजल विनोद जाधव याने ९८.८० टके गुण पटकावत जिल्ह्यात प्रथम आला आहे. याच शाळेतील विद्यार्थिनी अक्षरा इंगळे हिने ९८.४० टके गुण मिळवत वर्धा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, जिल्ह्यात प्रथम आणि द्वितीय असे दोन्ही मानाचे क्रमांक एकाच शाळेने मिळवत गुरुकुल पब्लिक स्कूलने इतिहास रचला आहे. शाळेतील ६६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. विशेष बाब म्हणजे सर्व ६६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २५ विद्यार्थ्यांनी ९० टयांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
सृजलचे वडील विनोद जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून आई गृहिणी आहे. त्याचा धाकटा भाऊ सुद्धा गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये सातवीत आहे. अभ्यासाबरोबरच सृजलला विविध पुस्तके वाचन आणि वतृत्त्वाची विशेष आवड आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा त्याने व्यत केली. जिल्ह्यातून द्वितीय आलेली अक्षरा इंगळे हिचे वडील वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असून आई गृहिणी आहे. अक्षरालाही वाचनाची विशेष आवड असून भविष्यात प्रशासकीय सेवेत जाऊन देशसेवा करण्याची तिची इच्छा आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
Gurukul Public School याच विद्यालयाचे सानिका डोबले हिने ९७.६० टके गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. रुचिका धारपुरे ९७.२०, सृष्टी इंगळे ९७.००, वैदेही इंगळे ९६.८०, अनुज मेंघरे ९६.६०, केतकी चरडे ९६.००, इशिका मुडे ९५.४०, गिरीश खवशी ९४.८०, गार्गी अजने ९४.६०, चैताली कामडी ९४.६०, वंश ढोले ९३.००, आरुषी हिंगवे ९३.००, श्रेया पाटील ९२.६०, सिद्दी मुने ९२.४०, तन्मयी गोटे ९२.२०, पुष्कर चोपड़े ९२.२०, वंशिता इंगळे ९२.२०, माही भुसारी ९२.००, नियती पाटील ९१.८०, सृष्टी एम. इंगळे ९१.२०, पूर्वा पांडुरकर ९०.८०, कलश कुर्वे ९०.४० आणि मयंक केवटे याने ९०.२० टके गुण प्राप्त केले.