जवाहर गुरुकुल विद्यालय ९५.९५ टक्के !

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नागपूर,
Jawahar Gurukul Vidyalaya महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत नंदनवन येथील जवाहर गुरुकुल विद्यालय चा निकाल ९५.९५ टक्के लागला आहे.
 

79 
 
 
या परीक्षेत नुसरत परवीन अब्दुल हकीम शेख हिने ८१ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. शाळेतील चार विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, सहा विद्यार्थी प्रथम श्रेणीत, आठ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर चार विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.या यशाबद्दल मुख्याध्यापक अनिल राठोड, संस्थेचे अध्यक्ष तथा  Jawahar Gurukul Vidyalaya माजी आमदार अशोक मानकर, संचालिका अंकिता वैद्य मानकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
सौजन्य:सुधीर अनवाणे,संपर्क मित्र