रेल्वेत पिस्तुल दाखवून प्रवाशांना धमकवणारे दोन गुंड गजाआड

    दिनांक :08-May-2026
Total Views |
रांची,
railway-crime-news : झारखंडमध्ये चालत्या रेल्वेत प्रवाशांवर पिस्तुल रोखून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन तरुणांना रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) अटक केली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती.
 

jharkhand 
 
 
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, धनबाद-डेहरी ऑन सोन इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. दोन तरुण रेल्वेच्या डब्यात पिस्तुल नाचवत प्रवाशांना धमकावत होते. या दोन्ही आरोपींनी मद्यपान केले होते आणि नशेत ते प्रवाशांशी गैरवर्तन करत होते. जेव्हा प्रवाशांनी त्यांच्या या कृत्याला विरोध केला, तेव्हा त्यांनी चक्क पिस्तुल काढून प्रवाशांवर रोखले.
RPF ची तत्पर कारवाई
काही प्रवाशांनी तातडीने या घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला आणि आरपीएफला दिली. रेल्वे झारखंडमधील लातेहार स्थानकावर पोहोचताच, आरपीएफच्या पथकाने डब्यात शिरून दोन्ही आरोपींना घेराव घातला आणि त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून शस्त्रसाठा जप्त
आरपीएफने अटक केलेल्या आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल (कट्टा) आणि काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या दोन्ही तरुणांविरुद्ध रेल्वे कायदा आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत. या धाडसी कारवाईमुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे.