नागपूर,
Journalists' Club of Nagpur “द कॅन्सर केअर फाउंडेशन, नागपूर” आणि “पत्रकार क्लब ऑफ नागपूर” यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १० मे रोजी नागपूर प्रेस क्लब, सिव्हिल लाईन्स येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणे, कॅन्सरबाबत जनजागृती करणे तसेच वेळेवर निदान व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
शिबिरात मुख, स्तन, फुफ्फुस आणि अंडाशयाच्या कॅन्सरची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय दंत, नेत्र, दमा व श्वसनविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, बोन डेन्सिटी, हृदयविकार, रक्तातील साखर तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणीची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. Journalists' Club of Nagpur प्रेस क्लब नागपूरचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, संयोजक अब्दुल गफूर पाशा यांनी पत्रकार परिषदेत शिबिराची माहिती दिली. शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांना आवश्यक पॅथॉलॉजी व रेडिओलॉजी तपासण्यांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.“कॅन्सरशी लढूया, जिंकूया आपण सर्वजण” असा संदेश “द कॅन्सर केअर फाउंडेशन”तर्फे देण्यात आला आहे.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र