केशवनगर विद्यालयाचा निकाल ९९.६८ टक्के

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नागपूर, 
Keshavnagar School संत जगनाडे चौक, नंदनवन येथील केशवनगर माध्यमिक दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९९.६८% लागला. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ३१८ पैकी ३१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम - गिरीश निमजे ९७.४० टक्के, द्वितीय - स्वानंदी अग्निहोत्री ९७.०० टक्के, तृतीय - खुशी खानोरकर ९६. टक्के गुण प्राप्त करून उत्कृष्ट यश मिळवले. प्राविण्य श्रेणीत ९० विद्यार्थी, प्रथम ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 
 
kshwa
 
Keshavnagar School  या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य मिलिंद भाकरे, उपमुख्याध्यापिका धारणा खळतकर, पर्यवेक्षक दिनेश शेटे, तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंदांचे आहे. केशवनगर सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, उपाध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव प्रशांत तुंगार, सहसचिव मुकुल मुळे, कोषाध्यक्ष अविनाश खळतकर, संचालक डॉ.विलास डांगरे, संचालक सुनील काशीकर, डॉ. प्रियदर्शन डॉ. रवींद्र भोयर व सर्व पदाधिकार्‍यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.