३ १ मे पासून खासदार क्रीडा महोत्सव

    दिनांक :08-May-2026
Total Views |
- १८ खेळांचा समावेश
नागपूर, 
'Khasdar Krida Mahotsav' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्थानिक स्तरावरील क्रीडापटूंसाठी आयोजित देशातील पहिल्या ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आठवे पर्व ३१मे पासून सुरू होत ७ जूनपर्यंत चालणार आहे. नागपुरातील उन्हाळा व वाढते तापमान बघता हा क्रीडा महोत्सव फक्त १८ मर्यादित आणि नागपूर शहरातील खेळाडूंसाठीच ठेवण्यात आला आहे. नागपूर शहरातील २० मैदानांवर हे खेळ होणार असून मॅरेथॉन सोडले तर सर्वच खेळ प्रकार सायंकाळी ६.३० नंतरच खेळले जाणार आहे. विजेत्यांना चषक व पदके प्रदान करण्यात येतील.
 
 
khas
 
'Khasdar Krida Mahotsav'  या क्रीडा महोत्सवाच्या ८व्या पर्वात १८ खेळांमध्ये कुस्ती, मॅराथॉन, खो-खो, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स, कबड्डी, जलतरण, बुद्धिबळ, कॅरम, व्हालीबॉल, योगासन, जिमनॅस्टिक, स्केटिंग, टेबल-टेनिस, सॉफ्टबॉल, बेंचप्रेस, पॉवरलिफ्टिंग अशा खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ही माहिती आज पत्रपरिषदेत आ. संदीप जोशी यांनी दिली. यावेळी पत्रपरिषदेला मनपा क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, डॉ. पद्माकर चोरघडे, डॉ.विवेक अवसरे, डॉ.संभाजी भोसले, नागेश सहारे, सतीश वडे, सुनील मानेकर, डॉ.सौरभ मोहोड आदि उपस्थित होते .
 
खेळ आणि मैदान याप्रकारे :
कुस्ती (भवानी मंडळ, पारडी), मॅरेथॉन व उद्घाटन समारंभ, ३१ मे (यशवंत स्टेडियम), खो-खो -४ ते ६ जून महिला महाविद्यालय, नंदनवन, बॅडमिंटन - १ ते ६ जून सुभेदार सभागृह, रवीनगर, अ‍ॅथलेटिक्स ३ ते ७ जून, विद्यापीठाचे मैदान, जलतरण एनआयटी जलतरण, अंबाझरी तसेच मोहता विज्ञान महाविद्यालय, १ ते ६ जून धरमपेठ क्रीडा मंडळ, शंकरनगर, बुद्धिबळ ४ ते ६ जून (धनवटे कॉलेज, काँग्रेसनगर), कॅरम ३ ते ४ जून कलाभवन, उत्तर नागपूर, बेंचप्रेस व पॉवरलिफ्टिंग ३ ते ४ जून हिंदू मुलींची शाळा, महाल, व्हॉलीबॉल - १ ते ४ जून, रघुजीनगर, योगासन ४ ते ६ जून स्मृती भवन, जिमनॅस्टिक २ ते ३ जून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कोराडी, हँडबॉल ४ ते ६ जून डीएसओ मैदान, टेबल टेनिस २ ते ४ जून गणेशपेठ, सॉफ्टबॉल ५ ते ६ जून धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेसनगर.