हिंगणघाट,
levy amount approved वर्धा जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्य हाताळणीचे काम करणार्या हमाल कामगारांना फेब्रुवारी २०१७ ते डिसेंबर २०२० या कालावधीतील ३० टके लेव्हीची थकीत रोख रकम अदा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार हमाल कामगारांची थकित असलेली देणी १ कोटी ७५ लाख ३५ हजार १९६ रुपये मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली होती. सदर दिर्घकालीन प्रलंबित प्रकरणी रोख रकम मंजुरीकरिता आमदार समीर कुणावार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून हमाल कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आ. कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळेच कामगारांना थकीत लेव्ही रकम अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्या हमाल कामगारांनी कृतज्ञता व्यत केली आहे.
या प्रकरणात उच्च न्यायालयातील रिट पिटीशन मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तसेच रकमेची परिगणना व तपासणी शासनाच्या प्रचलित नियम व धोरणांनुसार करण्यात आली असल्याच्या अटीवर संबंधित देयके अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.levy amount approved एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेल्या या देयकांसंदर्भात वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ मधील नियम ४० (१) अंतर्गत आवश्यक कारवाई करण्याचे अधिकार वापरून शासनाने ही मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यातील शेकडो हमाल कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या प्रलंबित आर्थिक मागणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.