जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा : बिदरी

    दिनांक :08-May-2026
Total Views |
- गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांचा घेतला आढावा

गोंदिया, 
जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढून शासनाच्या lok kalyankari yojana लोक कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, त्याचबरोबर जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढावे असे निर्देश नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.
 

bidari 
 
lok kalyankari yojana विभागीय आयुक्त बिदरी या शुक्रवारी ८ मे रोजी गोंदिया जिल्ह्याचा दौर्‍यावर असताना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरंगनाथम, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत प्रलंबित प्रशासकीय प्रकरणे, शेतीविषयक योजनांची सद्यास्थिती, ग्रामीण भागातील विकासकामे, पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन तसेच रोजगारनिर्मितीच्या संधी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना बिदरी यांनी जिल्हा प्रशासनाने कामकाजाला अधिक गती देण्याची आवश्यकता व्यक्त केली व जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.