- तिरोडातील गौ माता कत्तल व मांस विक्री प्रकरण
तिरोडा,
Meat sale case तिरोडा शहरात गौ माता कत्तल व मांस प्रकरण चांगलेच तापले असून या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपाखाली चार पोलिस कर्मचार्यांना पोलिस मुख्यालयात जमा करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.
(संग्रहित छायाचित्र )
Meat sale case पोलिस हवालदार नितेश बावने, ब्रिजेश मडावी, शैलेन्द्र दमाहे व विक्की धांडे असे त्या पोलिस कर्मचार्यांची नावे आहे. या प्रकरणात संबंधित पोलिस कर्मचार्यांनी योग्य ती कारवाई न केल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला होता. तर या घटनेच्या निषेधार्थ हिंदू संघटनांकडून तीव्र विरोध प्रदर्शन करण्यात आले होते. तसेच संपूर्ण प्रकरणाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने प्रशासनावर दबाव वाढला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीअंती ही कारवाई केल्याची माहिती आहे. सद्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.