नवयुग शाळा महालचा निकाल शत-प्रतिशत

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नागपूर :
Navyug School Mahal results भारतीय शिक्षण मंडळाद्वारे संचालित नवयुग विद्यालय, महालचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण उत्तीर्ण ८१ विद्यार्थ्यांपैकी प्राविण्य श्रेणीत १६ विद्यार्थी व प्रथम श्रेणीत २३ उत्तीर्ण झाले.
 
 
navyug
 
Navyug School Mahal results  यात प्रथम देवेंद्र प्रमोद चव्हाण (९६.८० टक्के), प्रथमेश माधव लोखंडे (९३टक्के), श्रवण गणेश साळुंखे (९०.६०टक्के), शर्वायू सिद्धार्थ उके (८८.६०टक्के), साक्षी जगदीश लांडे (८७.२०टक्के), मानसी विनोद खडगी (८६.४०टक्के), अदिती दीपक वाकोडे (८६.४०टक्के), प्रगती संजय चतुरकर (८४.२०टक्के) विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणीत स्थान प्राप्त केले. भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गजानन पिलपिले, उपेंद्र जोशी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाथ्रडकर, पर्यवेक्षिका वर्षा भुजाडे तसेच संपूर्ण शाळा परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.