न्यू इंग्लिश काँग्रेसनगरची शानदार यशाची परंपरा कायम

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नागपूर,
New English Congress Nagar न्यू इंग्लिश हायस्कूल, काँग्रेस नगर येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून शाळेचा गौरव वाढविला आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य लाभल्यामुळे हे यश शक्य झाले. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय टक्केवारी मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. शाळेला यावर्षी १०० टक्के निकाल प्राप्त झालेला आहे.त्यामध्ये आर्या मोहन नेवारे हिने गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अक्षरा युवराज राजनकर हिने ९०.४०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर स्मित संदीप चाटे याने गुण मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले.
 
 
new english
 
New English Congress Nagar  तसेच पीयूष बलचंद गायधने याने ८५.६०% तर जान्हवी गणेश जाधव हिने ८४.२०% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कार्यवाह अजेय धाक्रस, सहकार्यवाह श्याम पत्तरकीने, मंगेश वालेकर, प्राचार्य नरेंद्र रंगारी सर, पर्यवेक्षिका मेघा पाडळकर, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य लाभल्यामुळे हे यश शक्य झाल्याचे मुख्याध्यापक नरेंद्र रंगारी यांनी तभा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.