‘नाशिक फाईल’ प्रकरणात मुख्य संशयित निदा खान ताब्यात

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नाशिक,
Nashik Files 'नाशिक फाईल' प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य संशयित निदा खान हिला अखेर ताब्यात घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून तिला अटक करण्यात आली असून आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात यापूर्वीच काही आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र निदा खान फरार असल्याने तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी तपास करत होती. अखेर न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत तिला ताब्यात घेतले.
 
Nashik Files
 
तपासानुसार एका नामांकित माहिती तंत्रज्ञान संस्थेत काम करणाऱ्या काही महिलांना मानसिक आणि लैंगिक त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी आता पोलीस करत आहेत. Nashik Files दरम्यान संबंधित कंपनीनेही या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करत कोणत्याही प्रकारचा छळ किंवा जबरदस्ती सहन केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. आरोपांमध्ये नाव समोर आलेल्या काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.