एसटी प्रवासी व रुग्णांसाठी शुद्ध पाणी

    दिनांक :08-May-2026
Total Views |
पालकमंत्र्यांच्या हस्ते सौर ऊर्जेवरील प्रकल्पाचे लोकार्पण

यवतमाळ, 
Pure water for ST passengers सामान्य नागरिक, एसटी प्रवाशांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत एसटी बसस्थानक व वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सौर ऊर्जेवरील जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यवतमाळ एसटी बसस्थानकात आयोजित या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखेडे, नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की इतर मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
 
 
sanjay dsksl
 
Pure water for ST passengers  संजय राठोड यांनी यावेळी एसटी प्रवासी व रुग्णांसाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक व शाश्वत उपाय ठरणार असून विजेची बचत आणि खर्च कमी होणार असल्याचे सांगितले. तसेच स्वच्छ पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. एसटी प्रवासी व रुग्णालयातील नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेवून जिल्हा नियोजन अंतर्गत 15 कामांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कार्यक्रमात 7 ठिकाणी सौर उर्जेवरील जलशुद्धीकरण संयंत्रांचे लोकार्पण करण्यात आले. त्यामध्ये 4 एसटी बसस्थानक, 1 एसटी कार्यशाळा व 2 वैद्यकीय महाविद्यालयात हे संयंत्र उभारण्यात आले आहे. यात यवतमाळ, वणी, नेर, बाभुळगाव या बसस्थानकांचा समावेश आहे. या सौर उर्जेद्वारे 5 किलोवॅट वीजनिर्मिती होणार असून त्यावर जलशुद्धीकरण संयंत्र चालणार आहे.