पुसद भाजपात विजयी जल्लोष करतानाही गटबाजी

    दिनांक :08-May-2026
Total Views |
पुसद, 
Pusad BJP नगर परिषद निवडणुकीत भाजपाने सपाटून मार खाल्ला. मागील निवडणुकीत 10 सदस्य असताना या निवडणुकीत मात्र 5 सदस्यांवर समाधान मानावे लागले. पुसद शहरात भाजपाची जी शक्ती होती ती आता पार लयाला जात असल्याचे दिसून येते. त्याची भाजपा श्रेष्ठी आतातरी दखल घेतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
bjp
 
Pusad BJP  असे असूनही भाजपाचे नेते, पदाधिकारी ‘हम नही सुधरेंगे’ या न्यायाने वागत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या जल्लोष साजरा करतानाही पुसद भाजपाच्या गटबाजीचे दर्शन घडले. पुसद भाजपाची सूत्रे हाती असलेल्या एका गटाने शिवाजी चौकात जल्लोष केला तर भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मांदियाळी असलेल्या दुसèया गटाने सुभाष चौकात आनंद साजरा केला. या गटबाजीचे वर्णन करताना एका बाजूला नेते आणि दुसèया बाजूला कार्यकर्ते असे करता येईल. या गटबाजीमुळे भाजपाचे निष्ठावंत मात्र कमालीचे दुःखी आहेत.