नागपूर,
R. S. Mundley School समर्थ नगर येथील आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय ने यंदाही शालांत परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. २०२५-२६ च्या एसएससी परीक्षेत शाळेतील सर्व १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यामध्ये सृष्टी रेवतकर हिने १०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी शाळेतील विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे.निकालात ३४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले, तर ४२ विद्यार्थी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले. ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या २८ असून, १३ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले.धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. उल्हास औरंगाबादकर, मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी, पर्यवेक्षिका अमृता नगरकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. चारुलता ढगे तसेच प्राथमिक विभाग प्रमुख प्रांजली कुरळकर यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले.
सौजन्य:प्रीती लांबे, संपर्क मित्र