काही भागात झाला पाऊस
नागपूर,
Rain with wind गुरुवारनंतर शुक्रवारी सुध्दा वादळी वार्यासह पाऊस झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळपासून कडक उन्ह तापत असताना सायंकाळी ५च्या सुमारास अचानक वादळी वार्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. उत्तर व पूर्व नागपूरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली तर तुरळक प्रमाणात पाऊस झाला. दिवसाच्या तापमानात आंशिक घट होत पारा ३९.२ अंशाची नोंद झाली. नागपुरातील अनेक भागात वादळी वार्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण झाले होते. गेल्या महिनाभरापासून उकाड्याचा त्रास सहण करणार्या नागरिकांना अवकाळी पावसाने क्षणिक दिलासा दिला आहे.
आज अंशतः ढगाळ हवामान राहणार
Rain with wind हवामान विभागाने मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता होती. त्यानुसार पावसाने हजेरी लावली. शनिवार, ९ मे रोजी अंशतः ढगाळ हवामान राहणार असून १० ते १२ मे दरम्यान ३ दिवस हवामान स्वच्छ राहील. मात्र, १३ मे रोजी पुन्हा हवामानाचा मूड बदलण्याचे संकेत देण्यात आले आहे. या कालावधीत नागपूर शहराचे कमाल तापमान ४३-४४ अंश आणि किमान तापमान २५-२६ अंशांपर्यंत शक्यता आहे. विशेषत: गेल्यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असेच हवामान होते. काही भागांत गारपीटही झाली होती.