नागपूर, (सावनेर)
Residential School for the Deaf and Mute सर्व अडथळ्यांवर मात करत मूक बधीर निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी मॅट्रिक परीक्षेत शतप्रतिशत यश संपादन केले आहे.पौर्णिमा मोरे हिने ७८.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अंशुल हिंगवे (७८.२०%), चंचल मडके (७७.४०%), शुभम सावंत (७३.६०%) आणि मयूर पवार (७३%) यांनीही उल्लेखनीय यश मिळविले.
या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका सुवर्णा महाशबदे, शिक्षक-शिक्षिका व सहकारी कर्मचारी यांच्या परिश्रमांना असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मंगला समर्थ व सचिव नारायण समर्थ यांनी सांगितले.
सौजन्य: रवी वाघमारे ,संपर्क मित्र