गुणवंत विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी
उमरखेड :
Sakale School साकळे विद्यालयाचा यावर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल 88.05 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या यशस्वी निकालामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
(संग्रहित छायाचित्र )
Sakale School विद्यालयातून श्वेता गजानन शिंदे हिने 93.40 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. शांभवी संदेश देशमुख हिने 92.20 टक्के गुणांसह द्वितीय, तर आर्यक रवींद्र जोशी याने 90.20 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच धनश्री रमेश रणमळे हिने 88.20 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.