सरस्वती विद्यालयाचा एसएससी परीक्षेत १०० टक्के निकाल

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नागपूर ,
Saraswati Vidyalaya दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित सरस्वती विद्यालयाने एसएससी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये १०० टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 

angha  
 
 
या परीक्षेत शर्विका आशिष गजभिये हिने ९८.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांचे हे यश शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन,Saraswati Vidyalaya विद्यार्थ्यांची मेहनत आणि व्यवस्थापनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे मानले जात आहे.संस्थेचे अध्यक्ष टी. के. वेंकटेश, सचिव व्ही. मीनाक्षी, व्यवस्थापन सदस्य तसेच मुख्याध्यापिका लक्ष्मी श्रीनिवासन्, उपमुख्याध्यापिका शैली अय्यर, पर्यवेक्षक रवींद्र कुळकर्णी व राहुल घोडे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले.
सौजन्य : अनघा पेंडके,संपर्क मित्र