यवतमाळ,
Sardar Patel English School येथील सरदार पटेल इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेतील दहावीचा निकाल 100 टक्के लागून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे. शाळेतील अमेय महेंद्र टेंबरे या विद्यार्थ्याने 94.20 टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाने संपूर्ण संस्थेचा अभिमान उंचावला आहे.
Sardar Patel English School या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष कृपा पटेल व उपाध्यक्ष निशित पटेल यांनी विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना शितल काकडे, आशिष शुक्ला तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.