उमरखेड,
Students Welfare English School मागील सतत 14 वर्षांपासून दहावीच्या 100 टक्के निकालाची परंपरा दहागाव येथील स्टुडन्ट्स वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूल दहागावच्या विद्यार्थ्यांनी कायम राखत याही वर्षी परीक्षेत चकचकीत यश संपादन केले.
Students Welfare English School माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रणाली जयवंत चव्हाण हिने 93.80 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर गौरव शिंदे याने 92.80 गुण घेऊन द्वितीय व प्रज्वल प्रदीप तळेगावकर याने 92.60 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक, स्वरा आशिष लासिनकर 91.80 टक्के घेऊन चौथा, प्रांजली ज्योतिबा बरगेने 90.20 टक्क्यांसह पाचवा क्रमांक पटकावला.शाळेतील 6 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. 22 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. असून उर्वरित विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष दर्शन अग्रवाल, उपाध्यक्ष नारायण वड्डे, सचिव नितीन भुतडा, सदस्य डॉ. विलास चिरडे, सपना अग्रवाल, व्यवस्थापक आशिष लासिनकर, मुख्याध्यापक कदम, उपमुख्याध्यापक पल्लवी पराते यांनी अभिनंदन केले.