निकालाच्या धास्तीने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

    दिनांक :08-May-2026
Total Views |
छ. संभाजीनगर,
Suicide of a 10th grade student छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर परिसरात दहावीच्या निकालाच्या भीतीतून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सोहम ज्ञानेश्वर मोरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो अवघ्या १७ वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोहम दहावीमध्ये शिक्षण घेत होता आणि शुक्रवारी त्याचा निकाल जाहीर होणार होता. मात्र परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊ शकणार नाही, अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती. निकालाबाबतचा ताण वाढत गेल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
 
सारे
 
पुंडलिक नगरमधील गल्ली क्रमांक १० येथे राहत्या घरी सोहमने सकाळच्या सुमारास गळफास घेत जीवन संपवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे विद्यार्थ्यांवर वाढत चाललेला शैक्षणिक ताण आणि निकालाची भीती हा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे.