कोलकाता,
suvendu CM in Bengal पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्याची माहिती समोर आली असून, या बैठकीत शुभेंदूअधिकारी यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे. सर्व आमदारांच्या सहमतीने हा निर्णय झाल्याचे सांगितले जात असून, सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी ते लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती निरीक्षक म्हणून असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे या निर्णयाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शुभेंदू अधिकारी यांना राज्यातील पुढील मुख्यमंत्री म्हणून पुढे आणण्यात आल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

दरम्यान, सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शपथविधी सोहळा कोलकाता येथे आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, तो शनिवारी सकाळी होऊ शकतो असे सांगितले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.शुभेंदू अधिकारी हे पूर्वीच्या सत्ताधारी पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षात सामील झाले होते. त्यांनी नंदीग्राम आणि भवानीपूरसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्याने त्यांचे राजकीय स्थान अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जाते. राजकीय घडामोडींमध्ये पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे प्रमुख नेते यांच्यातील संघर्षही पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र सध्याच्या घडामोडींबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.