बातमीचा दणका : जिप बांधकामची धाव तेलंगटाकळीकडे

    दिनांक :08-May-2026
Total Views |
‘तरुण भारत’ इफेक्ट 
डझनभर अधिकाऱ्यांची उपकेंद्रावर पाहणी
ठेकेदाराला तत्काळ काम सुरू करण्याची तंबी

पांढरकवडा, 
Telangakali Health and Wellness Center Sub-Center तेलंगटाकळी येथील हेल्थ अँड वेलनेस सेंटर उपकेंद्राच्या अर्धवट व निकृष्ट कामाबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाची झोप उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बातमीच्या दणक्याने बांधकामचे डझनभर अधिकारी थेट उपकेंद्रावर दाखल झाले आणि अर्धवट पडून असलेल्या कामाची पाहणी केली. विशेष म्हणजे, पाहणीदरम्यान गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही पाचारण करण्यात आले होते. अधिकाèयांनी इमारतीतील अपूर्ण कामे, निकृष्ट बांधकाम आणि प्रलंबित सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित ठेकेदारालाही घटनास्थळी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली.
 
 
tb
 
Telangakali Health and Wellness Center Sub-Center  सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला तत्काळ उर्वरित कामे सुरू करून पूर्ण करण्याची तंबी दिली. अनेक महिन्यांपासून रखडलेले काम आणि वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणारे अधिकारी अचानक सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये संतापासोबतच आश्चर्यही आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतरही ही इमारत अपूर्ण अवस्थेत पडून असल्याची बाब ‘दैनिक तरुण भारत’ने 7 मे रोजी उघडकीस आणली होती. यवतमाळ पांढरकवडा या वर्दळीच्या मार्गावरील अपघातग्रस्तांना प्रथमोपचार मिळावा आणि गोरगरिबांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने उभारलेली ही इमारत प्रत्यक्षात बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.

कारवाईसुद्धा हवी
दरम्यान, बातमी आल्यानंतरच अधिकारी जागे होतात का, असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करीत असून, केवळ पाहणी न करता संबंधित दोषींवर कारवाईसुद्धा करण्याची मागणी जोर धरत आहे.