पुणे
Nasrapur incident पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील धक्कादायक माहिती आता समोर आली असून, नराधम आरोपीनं चिमुरडीचा आवाज दाबण्यासाठी तिच्या घशात मोजा कोंबला होता, ज्यामुळे श्वास रोखला जाऊन तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे.
Nasrapur incident १ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर पीडित मुलीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. या अहवालात मृत्यूचे कारण अत्यंत क्रूर असल्याचे समोर आले आहे. आरोपीने अत्याचार करताना मुलगी ओरडू नये म्हणून तिच्या घशात जबरदस्तीने मोजा कोंबला होता. वैद्यकीय भाषेत याला ‘अस्फिक्सिया’ म्हणतात, म्हणजेच श्वसन मार्ग बंद झाल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाला.
Nasrapur incident एवढेच नव्हे तर चिमुरडीच्या शरीरावर अनेक ठिकाणी दुखापतींच्या खुणा आढळल्या आहेत. विशेष म्हणजे, या जखमा बोथट आणि टणक हत्याराने केल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसेच मुलीच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता, ज्याचा उल्लेखही अहवालात आहे.