वरूड,
Theft of idols in Jain temple रवाळा येथील श्री क्षेत्र नागठाणा परिसरातील जैन मंदिरातील मुर्त्यांची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याने याप्रकरणी शे.घाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माहितीनुसार, रूपेश किशोर इंदाने हे गेल्या सात वर्षापासून नागठाणा जैन मंदीरात पुजारीचे काम पाहतात. ६ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास जैन मंदीरातील वेदीवरील पितळी अष्टधातुच्या संपूर्ण मुर्त्या मंदीरात व्यवस्थितीत ठेवल्या होत्या.
Theft of idols in Jain temple यावेळी मंदीरातील काम पाहणारे २ माताजी व एक जैन साधू असे एकूण १० लोक मंदीरातील खोल्यांमध्ये निद्रा घेत होते. पहाटे पाचच्या सुमारास लता महात्मे हिने रूपेशला येऊन सांगितले की, मंदीरातील एकूण पाच मुर्त्या व एका मुर्ती वरील छत्र दिसून येत नाही. त्यामुळे मंदीरातील मुर्त्याची पाहणी केली तेव्हा ९ इंच उंचीची ११ किलो वजनाची २१ हजाराची श्री आदिनाथ स्वामिची मूर्ती, ७ इंच उंचीची ५ किलो वजनाची ९ हजाराची मुनीसुव्रतनाथांची मुर्ती, ५ इंच उंचीची ४ किलो वजनाची ७ हजाराची श्री विमलसागर गुरूमुर्ती, ५ इंच उंचीची ४ किलो वजनाची ७ हजाराची सन्मती सागर गुरूमुर्ती, ७ इंच उंचीची ५ किलो वजनाची ९ हजाराची पद्मावती देवीमुर्ती, ४ हजाराचे पाषान मुर्ती वरील २ किलो वजनाचे छत्र अशा प्रकारे वेदीवरील ठेवलेल्या अष्ट धातुच्या मुर्त्या व एका पाषाण मुर्ती वरील ३१ किलो वजनाचे ५७ हजाराचे छत्र अज्ञात चोरटयाने लंपास केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पुजारी रूपेश इंदाने यांनी शे.घाट पोलिसांत ७ मे रोजी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.